जुलै मधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर रायगड जिल्ह्यातील सहा हजार सहाशे तेवीस बाधितांना देण्यात येणार मदत

 

 

अलिबाग,दि.9 (जिमाका):- जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीचा पावसाने झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत देण्याचा सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील 5594 पात्र नागरिकांना जवळपास 54 लक्ष रुपये अर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे , अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

या अंतर्गत अनुदान संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना वर्ग करण्यात आले असून यामध्ये निवारा केंद्रात स्थलांतरित केलेल्या 5 हजार 96 नागरिकांसाठी 29 लाख 24 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याचबरोबर 452 घरांच्या पुनर्बांधणीसाठी सात लक्ष 98 हजार रुपये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई साठी पंधरा लक्ष 83 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

राज्यात 19 ते 23 जुलै या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे मोठे नुकसान झाले होते बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याच्या  अनुषंगाने  शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये काही बाबींवर विशेष दराने वाढीव मदत देण्याचा देखील सूचना शासनाने केल्या आहेत. प्रामुख्याने पूर व अतिवृष्टीमुळे घरे वाहून जाणे पूर्णपणे शतिग्रस्त होणे अथवा दोन दिवसांपेक्षा अधिक काळ घरे व शेत्र पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. यासाठी पूर्वीच्या दरानुसार वाढ करण्यात आले असून दहा हजार रुपये मदत शासनाकडून देण्यात येणार आहे याचबरोबर दुकानदार अथवा टपरीधारक आदींना नैसर्गिक आपत्तीमुळे मदत देण्यासाठी कोणतीही तरतूद राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये करण्यात आले नव्हते त्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

यासाठीचे वारस पंचनामे , वारस संमती पत्र आदींची कार्यवाही सुरुवात करण्यात आली असून निवारा केंद्र व तात्पुरते स्थलांतर झालेल्या ठिकाणी सोयी सुविधांसाठी याअनुदानातील खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत