साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्यास इच्छूक अर्जदारांनी प्रस्ताव सादर करावेत

 

 

अलिबाग (जिमाका) दि.8 :- शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या 12 पोट जातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अंगद  कांबळे यांनी कळविले आहे.

 

थेट कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांनी शासनाच्या नियमानुसार व महामंडळाच्या परिपत्रकातील अटी/शर्ती/निकष व नियमानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन दि.01 सप्टेंबर ते दि.30 नोव्हेंबर, 2023 या विहित कालावधीत जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या, सदनिका क्र.2 तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, ता.अलिबाग, जि.रायगड या पत्त्यावर अर्ज देणे. तसेच मूळ दस्तऐवजासह स्वतः साक्षांकित करून कर्ज प्रस्ताव स्विकारण्यात येतील,असे जिल्हा व्यवस्थापक, श्री कांबळे यांनी कळविले आहे.

००००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत