कर्जत वनपरिक्षेत्रातील खांडस येथे वागूरची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने केली यशस्वी कारवाई


 

अलिबाग,दि.06(जिमाका):- कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना खांडस येथे दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी काही शिकारी लोक जंगलात गेल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने राऊंड स्टाफ मौजे-खांडस गावाच्या पुढे जंगलाच्या दिशेने गस्त करीत असताना त्यांना MH-02 CP-2667 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ईको गाडी संशयित वाटल्याने या गाडीचा 3 ते 4 मीटर पाठलाग करून थांबविली. या गाडीत वागूर नग-4, वागूर उभे करण्यासाठी 28 बांबूच्या काठ्या व दोन ठासनीच्या बंदुका मिळाल्या.

चालक देवानंद विठ्ठल खांडवी, रा.वडाचीवाडी नांदगाव, ता.कर्जत, यांच्यासह आरोपी रविंद्र रावजी वारगुडे व विशाल धोंडू बांगारे दोघेही रा.पेठारवाडी, ता.कर्जत असे एकूण तीन आरोपींना गाडी व मुद्देमालासह ताब्यात घेतले. कर्जत (पूर्व) वनपरिक्षेत्र अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

वनपाल खांडस (अतिरिक्त कार्यभार) श्री.काळुराम दगडू लांघी, खांडस वनरक्षक श्री.प्रकाश वैजनाथ मुंढे, चाफेवाडी वनरक्षक श्री.माधव शंकर केंद्रे व जामंरुग वनरक्षक श्री.विठ्ठल बळीराम खांदाजे हे या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईकरिता अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कर्जत तालुक्यात जेथे वनक्षेत्रात अवैधपणे कोणताही वनगुन्हा होत असल्याचे निदर्शनास आल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज