सामजिक न्याय व बहुजन कल्याण विभागाच्या महाविद्यालयीन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांचे आवाहन

 

 

रायगड (जिमाका), दि.16 :- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमात्र, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार असून रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना / विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन डॉ. योगेश म्हसे जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.

 अर्ज विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात.

तरी योजनेच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छि भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंटमेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधवा.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन