कौटुंबिक न्यायालयाची भूमिका व मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज, सद्यस्थिती तसेच मराठी साहित्याच्या नजरेतून कुटुंबाचे महत्व या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन

 

 

         रायगड,दि.25(जिमाका):- कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग आणि लायन्स क्लब श्रीबाग शाखा, अलिबाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालय, श्रीबाग, चेंढरे, कच्छी भवन, दुसरा मजला, अलिबाग, येथे सोमवार, दि. 29 जानेवारी रोजी सायं.4.00 ते 6.00 या वेळेत कौटुंबिक न्यायालयाची भूमिका व मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज, सद्यस्थिती तसेच मराठी साहित्याच्या नजरेतून कुटुंबाचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालय, अलिबागच्या न्यायाधीश श्रीमती ए.ए शिंदे तर  प्रमुख वक्त्या म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा अलिबाग अध्यक्षा श्रीमती सुजाता पाटील असणार आहेत.  कार्यक्रमासाठी फाउन्डर प्रेसिडेन्ट, लायन्स क्लब श्रीबाग शाखा, अलिबाग लायन डॉ.अॅड. निहा राऊत व लायन्सक्लब श्रीबाग शाखा, आलिबाग अध्यक्ष  लायन संजय रावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत