प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 


 

रायगड,दि.26 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 75  व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे  यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे  यांनी 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत