शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER १) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

 

रायगड-अलिबाग,दि.९(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, १९५९ व नियम १९६० च्याकलम ५ (१) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम ४ (२ अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार यांनी केले आहे.

                त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे मार्च,२०२६ अखेर संपणाऱ्या जानेवारी ते मार्च  या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment याटॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुनआपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारेú आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी दिनांक ३० एप्रिल, २०२६ पर्यंत आहे, याची सर्वशासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी.

त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यकती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास याकार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर - ०२१४१-२२२०२९ अथवा या कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म.भा.वखरे, यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२१६१३७५७ वर संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन