जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा
रायगड-अलिबाग,दि.९(जिमाका):-शा
या कार्यक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जन औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.हराळकर,डॉ.नकाते, डॉ. बंटेवाड, डॉ.क्षीरसागर, डॉ.नाझिया उपस्थित होते
यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेची थीम Together for health, Stand with science अशी ठेवण्यात आली असून आरोग्याबाबत जानजागृती करण्यावर भर देण्यात आला होता.
या निमित्ताने विविध स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर रचना स्पर्धा, रिल्स तयार करण्याची स्पर्धा, क्विझ स्पर्धा तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचा उद्देश आरोग्य व हक्काविषयी जनजागृती करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विषयीची जाणीव निर्माण करणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. “आरोग्यासाठी एकत्र या विज्ञानाला साथ द्या” हा संदेश देत आरोग्याबाबत जागरूक समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.महादेव घोरपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप माळी यांनी केले.
००००००
Comments
Post a Comment