सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले आज साधणार ई-संवाद : नागरिक-विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारण्याची सुविधा



अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना.राजकुमार बडोले, हे राज्यातील जनतेशी गुरुवार दि. 15  रोजी सकाळी साडे अकरा वा. लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग,आणि निराश्रीत इत्यादी समाजघटकांसाठी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बरोबरच सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ई-संवादद्वारे जनतेच्या विविध प्रश्नांची उत्तरे श्री. बडोले देणार आहेत.  या कार्यक्रमात elearning.parthinfotech.in लिंक द्वारे सहभागी होऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, त्यांची यशस्विता, याबाबतचे प्रश्न, 83 84 85 86 85 या क्रमांकावर व्हॉटसअॅप द्वारे श्री. बडोले यांना विचारावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे. हे प्रक्षेपण दिलेल्या लिंकवरुन स्मार्ट फोन, टॅबलेट इ. वर ही पाहता येणार आहे. त्यासंदर्भात तांत्रिक अडचण आल्यास 022-27643000 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रायगड तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत