सेवा पंधरवडा अंतर्गत विविध शैक्षणिक योजनांबाबत खारघर येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- राज्य शासन व केंद्र शासन यांच्या वतीने सेवा पंधरवडा दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधी दरम्यान साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड व जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, अलिबाग यांच्या वतीने दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेबाबत तसेच विदयार्थ्यांना सामजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मनी मार्जिन योजना, परदेशी शिष्यवृती, शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया तसेच समान संधी केंद्र, जात  वैधता प्रमाणपत्र इत्यादी योजनेच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरुन घेण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव व रायगड जिल्हा जात पडताळणी समिती संशोधन अधिकारी रविकिरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

00000

Comments