क्रीडा शिक्षकांसाठी राज्यस्तर मास्टर ट्रेनर प्रशिक्षण



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी क्रीडा धोरणानुसार खेळातील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षणाच्या पद्धती,नवीन खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी,पुणे येथे क्रीडा शिक्षकांचे निवासी राज्यस्तर मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातून 10 पात्र क्रीडा शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे त्यातील 5 हे फुटबॉल खेळातील असणार आहेत.
मास्टर ट्रेनर साठीचे निकष –
१)     जिल्ह्यातील ज्या शाळांचे अधिक संघ शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य मिळवत असतील तसेच त्यांचेकडे क्रीडा सुविधा उपलब्ध असतील अशा शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल.
२)     राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच उच्चतम क्रीडा अर्हता (एन.आय.एस.,एम.पी.एड इ.)
३)     जिल्ह्यामध्ये विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये यांचे जाळे असणा-या शिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणानंतर किमान 10 वर्षे सेवा शिल्लक असावी.
मास्टर ट्रेनर करीता उपरोक्त निकषानुसार रायगड जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी विहीत नमुन्यातील अर्जासाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रायगड, जिल्हा क्रीडा संकुल,नेहुली संगम,पो.वेश्वी, ता.अलिबाग, जि.रायगड तसेच क्रीडा अधिकारी श्री.विशाल बोडके ९८९०९१९२९७, श्री.सुनिल कोळी ८४११८७५३९८ यांचेशी संपर्क साधावा. विहित नमुन्यातील अर्ज दि. 8 डिसेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत