कुडे शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह;तिघे संशयित ताब्यात

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- माणगांव वनपरिक्षेत्रात  येणाऱ्या  मौजे कुडे ता. तळा या गावच्या शिवारात सोमवार दि.4 रोजी बिबट्याचा मृतदेह आढळला आहे.
या संदर्भात उपवनसंरक्षक रोहा यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, वनपाल तळा  यांना सोमवार दि.4 रोजी सायंकाळी  दुरध्वनी संदेशाव्दारे माहिती मिळाली की,  मौजे.कुडे ता.तळा येथील श्री.विरेन वेदशरण छाब्रा यांचे मालकी सर्व्हे नंबर 93  चे क्षेत्रात एका  बिबट्याचा मृत देह आढळून आला आहे. सदर बातमी मिळाल्यावरुन त्या ठिकाणी क्षेत्रीय वनकर्मचारी तात्काळ पोहोचले व त्यांनी सदर घटनेबाबत वन्यजीव (संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 9,39 (अ), (ब), (ड) ,39(2),44 (क) अन्वये घडलेल्या घटनेचा प्रथम अपराध प्रतिवृत्त नोंदविले.

घटना स्थळाच्या  पंचनाम्यात सदर बिबट नर जातीचा आढळून आला. तसेच  त्याच्या पंजातील नखे काढुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तदनंतर  सदर मृत बिबट्यास शवविच्छेदन कामी  Maharashtra Animal & Fishery Sciences University, Nagpur, Department of Veterinary Pathology, Bombay Veterinary College, Parel , Mumbai-12  येथे पाठविण्यात आले. तेथे एक्सरे रिपोर्ट व ङिएन.ए.रिपोर्ट ही घेण्यात आला आहे. शवाचा व्हीसेरा पुढील तपासासाठी  पाठविण्यात आला आहे.  सदर गुन्हयाचा तपास त्वरेने हाती घेण्यात आला असून तपास प्रगतीपथावर आहे. याप्रकरणी आता पर्यंत तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मृत बिबटयाची 6 नखे हस्तगत करण्यात आली आहेत. गुन्हयाचा तपास उपवनसंरक्षक - रोहा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक , रोहा व वनक्षेत्रपाल - माणगाव हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक