जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्कार; :इच्छुकांकडून अर्ज मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-सामाजिक विकास,शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या नि:स्वार्थी  लोकांना जमनालाल बजाज फाऊंडेशन या संस्थेमार्फत  ट्रॉफी व कॅश रु. दहा लाख इतकी रक्कम देवून  गौरविण्यात येते. हा पुरस्कार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रदान करण्यात येणार आहे. त्यात तीन राष्ट्रीय तर एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असून त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे तसेच www.jamnalalbajajawards.org (for awards background, objectives, criteria guidelines and nomination format) व http://jamnalalbajajawards.org/nomination forms(for online submission of nomination) या  वेबसाईटवर उपलब्ध् करुन देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप- कंस्ट्रक्टिव वर्क इन इंडिया,एप्लिकेशन ऑफ सायन्स् अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट.,डेव्हलपमेंट अँड वेलफेअर ऑफ वुमेन अँड चिन्ड्रेन.,
आंतरराष्ट्रीय पुरस्कार-इंटरनॅशनल वॉर्ड फॉर प्रमोटींग गांधीअन व्हॅल्यूज.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार दि.28 फेब्रुवारी पर्यंत जमनालाल बजाज फाऊंडेशन या संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज