ढगाळ वातावरण व पावसाळा सदृश्यस्थितीमध्ये आंबा पिकाची घ्यावयाची काळजी



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.8-बंगालच्या उपसागरात व श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाप्षयुक्त वातावरण दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदूर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आंबा पिकामध्ये तुडतुड्याचा प्रभाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो. तसेच पाऊस पडल्यास आंबा मोहरावर करपा रोग आणि भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झॉम 25 W.G. (तीन ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी सोबत करपा व भूरी रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डेझीम मॅन्कोझेब (साफ, सफाई, कॅम्पनियन) हे तयार मिश्रण 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच ज्या आंबा बागेमध्ये पानगळ सुरु आहे अशा बागांमध्ये लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सल्फर 80 W.G. (80 टक्के पाण्यात विरघळणारे पावडर) 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज