लोकशाही दिन तक्रारींचे निराकरण वेळीच करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश
अलिबाग,जि. रायगड दि.5- लोकशाही दिन, आपले
सरकार वेब पोर्टल या सारख्या अधिकृत व्यासपीठावर सामान्य जनतेकडून प्राप्त होणाऱ्या
तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी कटाक्षाने प्रयत्न करावे,
असे निर्देश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित
करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात
आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात
आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, रामेती प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य पी.डी. शिगेदार , जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अनिल लोखंडे, कामगार
उपायुक्त अ.र.काकतकर, कामगार अधिकारी नि. का.देठे, कार्यकारी अभियंता साबांवि पनवेल
आर.एस, मोरे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी लोकशाही
दिनानिमित्त आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच आपले सरकार या वेवपोर्टलवर जिल्ह्यातून
झालेल्या तक्रारींचाही आढावा घेतला. ज्या ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाने
तात्काळ त्या तक्रारीची दखल घ्यावी व पुर्तता करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
लोकशाही दिनात आज एकूण ६ अर्ज प्राप्त झाले. त्यात
महसूल विभाग-३, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी -३ अर्जांचा समावेश आहे.
०००००
Comments
Post a Comment