कुटूंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्यांचा गौरव समारंभ संपन्न



अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक रायगड-अलिबाग यांच्या तर्फे व इनजेंडर हेल्थ या संस्थेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट संस्था व सेवा प्रदात यांचा गौरव समांरभ कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई इन रेवस रोड, चोंढी येथे संपन्न झाला. 
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.सुचिता गवळी, डॉ.श्रीम.सिंग, जिल्हा माता  व बालसंगोपन अधिकारी डॉ.चंद्रकांत जगताप, शल्य चिकित्सक माणगाव डॉ.कामेरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ माणगाव डॉ.सिध्दी कामेरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अडतमोल, जिल्हा विस्तार माध्यम विस्तार अधिकारी जि.प.राजेंद्र भिसे, इनजेंडर हेल्थ या संस्थेचे डॉ.सागर खांडेकर, नम्रता दोषी, कांक्षा सिंग, श्याम गायकवाड आदि उपस्थितीत होते.
            आरोग्य संस्था व सेवा प्रदाते यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रवृत्त व गुणवत्तापूर्ण कुटूंब नियोजन कार्यक्रम आणि साधने प्रत्येक जोडप्यापर्यंत समुदायामध्ये त्यांच्या निवडीनुसार पोहोचावी हा या कार्यक्रमाचा हेतू होता.  या कार्यक्रमांतर्गत  जून 2018 ते जुलै 2019 या कालावधीतीत  चांगली कामिगिरी बजावलेल्या उत्कृष्ट सेवा प्रदात्या संस्थांचा  इनजेंडर हेल्थ संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे.  सर्वात जास्त तांबी (IUCD) बसवलेली संस्था-जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.   सर्वाधिक इंजे.अंतरा (MPA) चे डोसेस प्रदान करणारी संस्था- जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.  सर्वाधिक पीपीआययूसीडी बसवणारे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडकर.  सर्वाधिक पीपीआययूसीडी बसवणाऱ्या स्टाफ नर्स श्रीमती हर्षदा निलकर,जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग.   सर्वोकृष्ट समुदेशन कोपरा श्रीम.नम्रता नागले जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग. 
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, डॉ.सुधाकर मोरे व अन्य मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त करुन कार्यक्रमाविषयी माहिती उपस्थितांना दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार इनजेंडर हेल्थ संस्थेचे श्याम गायकवाड यांनी मानले.  कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व इशस्तवन आणि स्वागतगीताने  करण्यात आली.  कार्यक्रमाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील व जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी,नर्सेस उपस्थितीत होते.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत