निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण

 

 

रायगड,दि.23(जिमाका):- सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये  निवडणूक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो आब्जव्हर्स) यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे.त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी नि:पक्षपातीपणे पार पाडावी, असे निर्देश 32 रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले.

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पणे पार पडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ.ज्योस्त्ना पडियार,उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निरीक्षक झा म्हणाले, नि:पक्ष आणि मोकळया वातावरणात होणाऱ्या निवडणूकीचे सूक्ष्म निरीक्षक हे साक्षीदार आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसून ते निवडणूक निरीक्षक आणि आयोगास उत्तरदायी आहेत.  मतदान केंद्रावर तसेच गृह मतदानाच्या वेळी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे श्री. झा यांनी यावेळी सांगितले

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती पडियार यांनी सूक्ष्म निरीक्षक कार्य व कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक