कृषि योजनाः शेतकऱ्यांच्या सुचनांसाठी टोल फ्री क्रमांक
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या जातात. या
योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषि सचिन्द्र प्रताप
सिंग यांनी केले आहे. तसेच या योजनांसंदर्भात व अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या
अडचणी, सुचना शेतकऱ्यांनी मोफत टोल फ्री
क्रमांक, एसएमएस व ई-मेलद्वारे कळवाव्यात असेही आवाहन केले आहे.
कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचनाकरिता 367 कोटी
रुपये, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट, पॉलीहाऊस करिता 50 कोटी रुपये, कांदाचाळ उभारणीकरिता 50कोटी रुपये, शेततळे अस्तरीकरणाकरिता 25कोटी रुपये आणि कृषि यांत्रिकिकरणासाठी 98कोटी रुपये याप्रमाणे कृषि विभागाकडे अनुदान उपलब्ध आहे. एवढया मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. या योजनांना शेतकऱ्यांनी प्रतिसाद
द्यावा यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे.
ज्या शेतकऱ्यांना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून संबधित योजनेच्या लाभाकरिता पुर्व संमती दिलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी घटकांची अंमलबजावणी करुन तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अनुदान मागणी करावी. सर्व योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी घटकांची अंमलबजावणी करुन अनुदानाची मागणी केली आहे, पण त्यांना अनुदान मिळण्यास काही अडचणी उद्भवल्यास त्यांनी त्या कृषि आयुक्तालयाच्या निदर्शनास आणाव्यात. त्यासाठी त्यांनी खालील पर्यायांचा
अवलंब करावा.
- लेखी स्वरुपात ई-मेलद्वारे. farmerhelp2017@gmail.com
- दूरध्वनीद्वारे टोल फ्री
क्रमांक. 1800 233 4000
- एस.एम.एस. साठी भ्रमणध्वनी
क्रमांक. 9423440066
या
संपर्क माध्यमांवर शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी व सकारात्मक सुचना कराव्या.
त्यांची कृषि आयुक्तालयाकडून दखल घेण्यात येईलअसे ही
कृषि आयुक्तांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment