कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

 


 

रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका) :- "कर्करोग हा जगातील सर्वात गंभीर आणि जीवघेण्या आजारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यु या आजारामुळे होतो, कर्करोगाबाबत जनजागृती वाढावी, वेळेवर त्तपासणी आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतीक कर्करोग दिन साजरा केला जातो. सदर जागतीक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कारागृहातील दाखल बंद्यांमध्ये जनजागृती व्हावी तसंच कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याची माहित्ती देण्यासाठी नुकताच अलिबाग जिल्हा कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, वर्ग-2 विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था, अलिबाग डॉ. मिलिंद पाटील, व उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबाग डॉ.नितीन गांधी  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात कशी झाली तसेच या दिवसाचा मुख्य उद्देश, कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत बंद्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उज्वल भविष्य सामाजिक संस्था,अलिबाग डॉ.राजाराम हुलबान यांनी बंद्यांना मार्गदर्शन करताना कर्करोगाबाचत समाजात असलेले गैरसमज दूर करणे, कर्करोग हा फक्त शारीरिक आजार नसून तो मानसिक आणि सामाजिक आवाहन ही आहे. या आजारामुळे रुग्णासोबत त्याच्या कुटुंबालाही अनेक अडचणींना सामोरे जावे जागते. या दिवसामागील हेतु म्हणजे समाजात कर्करोगाविषयी जागरुकता वाढवावी. कर्करोगाची वेळेवर ओळख व उपाययोजनांचे महत्व समजावणे, कर्करोगग्रस्त आणि कुटुंबाला मानसिक व सामाजिक आधार देणे योग्य माहिती वेळेवर मिळाल्यास, जागरुकता आणि उपचार मिळाल्यास अनेकांचे जीवन वाचू शकते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील रामहरी कुटे, सुभेदार, सुनिल जाधव, हवालदार, अजय जावळे,  सतिश जुंबळे, का. शिपाई तसेच श्रीम.क्रांती कदम, महिला शिपाई इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान