जिल्ह्यात मनाई आदेश जारी



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.19:- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मंगळवार दि. 29 जानेवारी 2019 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.  अपर जिल्हादंडाधिकारी किरण पाणबुडे यांनी हे आदेश निर्गमित केले असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
00000

Comments