रक्तदान जनजागृतीसाठी प्रभातफेरी


        अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- रक्तदानाविषयक समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या वतीने  आज अलिबाग शहरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते या प्रभात फेरीस हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी   अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास कोरे, अधिसेविका जयश्री मोरे, डॉ. अनिल फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेते सुजित पाटील व प्रणाली जमदाडे यांना प्रथम क्रमांक, मनाली पाटील व विनीता पाटील यांना द्वितीय क्रमांक, प्रणाली चांदोरकर व भाविका भोईर यांना तृतीय  क्रमांक विभागून पारितोषिक देण्यात आले. तसेच नियमित रक्तदात्यांचा सत्कारही करण्यात आला. या रॅलीत जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय, रोटरी क्लबचे डॉ. सुनिल भोपाळे, प्रिझम सामाजिक संस्थेच्या तपस्वी गोंधळी, रुरल यंग फाऊंडेशन, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज,  जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग  ट्रेनिंग सेंटरच्या  विद्यार्थिनी,  स्वयंसिद्धा सामाजिक संस्थेच्या सुचिता साळवी आदींची उपस्थित होती. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी  शासकीय रक्तपेढीचे डॉ. दीपक गोसावी, हेमकांत  सोनार,  सुनिल बंदीछोडे, विरेंद्र स्वामी, प्रमोद जगताप, महेश घाडगे, संकेत घरत, उमेश पाटील, मनिषा धाटावकर, पुनम पाटील, चेतना वर्तक आदींनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज