जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत मुदत
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यात भारत सरकार द्वारा (मानव संशोधन
विकास मंत्रालय)येथे चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय
या निवासी विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2018 साठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार दि.10
फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी साडेअकरा वाजता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियोजीत परीक्षा
केंद्रांवर होणार आहे.या प्रवेश परीक्षेचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया या वर्षापासून
ऑनलाईन करण्यात आलेली असून प्रवेश अर्ज दि.25 सप्टेंबर 2017 पासून www.nvshq.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 25
नोव्हेंबर 2017 आहे.
प्रवेश परीक्षा
अर्ज भरण्याची पद्धत पुढीलप्रमाणे-
प्रथम वरील संकेतस्थळावरुन Certificateडाऊनलोड करुन घ्यावे व त्याची झेराक्स्
कॉपी घेऊन विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता पाचवी च्या वर्गात शिकत आहे त्या शाळेत जाऊन
संपूर्ण फॉर्म काटेकोरपणे तसेच सर्व रकाने व्यवस्थित भरुन त्याच्यावर पालकांची सही
घ्यावी व नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांची सही घेऊन शाळेचा शिक्का मारावा. नंतर हा संपूर्ण
भरलेला फॉर्म घेऊन स्वताच्या पालकांसोबत आपल्या जवळपास असणाऱ्या सेतू केंद्रात अथवा
ई-सेवा केंद्रात जाऊन शाळेने भरुन दिलेल्या Certificate आधारे
तेथील अधिकाऱ्यास तो भरावयास सांगावा.पूर्ण भरलेला अर्ज अपलोड करण्यास सांगावे. जर
आपला परीक्षा प्रवेशअर्ज व्यवस्थित अपलोड झाला असेल तर आपणास ई-सेवा केंद्रातून आपले
परीक्षा प्रवेशपत्र 15 जानेवारी 2018 नंतर डाऊनलोड करुन घेता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्कः-बी.बी.माळी-9420650395,यु.एन.शिंदे-9421867936, शैलेश पडवळ-942309 1468 यांचेशी
संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा आवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय,
निजामपूर ता.माणगांव जि. रायगड यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment