किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी
रायगड जिल्ह्यात आंबा हे प्रमुख फळपीक असुन माहे डिसेंबर - जानेवारी
पासुनच मोहोर बहरण्याच्या कालावधीची सुरुवात होते. अधिक व दर्जेदार उत्पादन
मिळण्याच्या दृष्टिकोनातुन आंबा बागायतदार, आंब्यावरील किड-रोगाच्या
नियंत्रणाकरीता वेगवेगळया किटकनाशकांची मोठ्याप्रमाणावर वेळोवेळी फवारणी करतात.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक किटकनाशके,तणनाशके तसेच बुरशीनाशके फवारणी
करताना किंवा ती हाताळताना खालील सुचनांचे पालन शेतकरी बांधवांनी करावे.
रासायनिक औषधांचे अत्यंत
बारिक कण हवेबरोबर श्वासोच्छासासोबत शरीरात जातात.फवारणी करीत असतांना त्वचेच्या
संपर्कामधून तथा डोळ्यांद्वारे शरीरात जातात.फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे
खातांना,
पितांना शरीरात जाऊ शकतात.
सर्वसाधारणपणे घ्यावयाची
काळजी-
गळके फवारणी यंत्र न वापरता
ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी
नरसाळ्याचा (चाडीचा) वापर
करावा., तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशके
वापरताना संरक्षक कपडे वापरावेत. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने
स्वच्छ धुवुन ठेवावेत.झिजलेले, खराब
झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे
टाळावे.फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याचा किंवा काठीचा वापर करावा.किटकनाशके
पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी
तंबाखु खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे.फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबणाने
स्वच्छ धुवुन खाणे-पिणे करावे.फवारणीचे
वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणा पासून दुर
ठेवावे.उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी.फवारणी करतांना
वापरलेली भांडी इ.साहित्य नदी - नाला किंवा विहीरीजवळ धुवु नयेत, तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष
असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. किटकनाशकांच्या रिकाम्या
बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात.फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ
करण्यासाठी तोंड लावुन फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढु नये यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.किटकनाशके फवारण्याचे
काम दर दिवशी आठ तासापेक्षा जास्तवेळ करु नये. हे काम करणाऱ्या व्यक्तीने वेळोवेळी
डॉक्टरकडे जाऊन स्वतःची तपासणी करुन घ्यावी. किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून
वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये.किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर किमान
दोन आठवडे गुरांना चरण्यास जावू देऊ नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न
पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती / चिखल
यांच्या सहाय्याने शोषून घ्यावत व जमिनीत गाडून टाकावे. डब्यावरील
मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुणा असलेली औषधी विषारी असुन त्यानंतर पिवळा, निळा
व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना- विषबाधा
ही किटकनाशके/तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क अथवा
पोटत गेल्यास होते.विषबाधा व इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा
साम्य राहू शकते.
विषबाधाची लक्षणे- अशक्तपणा
व चक्कर येणे. त्वचेची जळजळ होणे, डाग
पडणे, घाम
येणे. डोळ्यांची जळजळ होणे, पाणी
येणे, अंधुक
दिसणे. तोंडातुन लाळ गळणे, तोंडाची
आग होणे, उलटी
येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात
दुखणे. डोकेदुखी, अस्वस्थ
होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द
होणे, धाप
लागणे, छातीत
दुखणे, खोकला
येणे.
विषबाधेची
शंका आल्यास खात्री करा.रोग्याच्या किटकनाशकांसह
संपर्क आला होता काय ?नेमके कोणते किटकनाशके वापरले ?शरीरात किती गेले ? व ते केव्हा गेले ? डॉक्टरांसाठी हीच माहिती
महत्वाची आहे.
विषबाधेनंतर
तातडीने करावयाचे प्रथमोपचार- किटकनाशके/तणनाशके डोळ्यांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटापर्यंत
पाण्याची धार सोडुन धुवावे.शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे
व दवाखान्यात न्यावे.विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास
प्रवृत्त करावे अन्यथा नाही व 3 चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास
पाण्यातुन पाजा व लगेच दवाखान्यात न्या. विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते
कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.
काय करावे व काय करु नये?-दोन किटकनाशकांचे केलेले मिश्रण
ताबडतोब वापरावे. मिश्रण तयार केल्यावरच बराच वेळ ठेवले तर गणुधर्म कमी होतात.
किटक नाशकाचे मिश्रम आठ तासाचे आत फवारणीसाठी वापरावे. पाण्यात विरघळणारी पावडर
वापरणे.
बीजप्रक्रीया
करतांना बियाण्यांस प्रथम किटक नाशक चोळावे व नंतर जीवाणू संवर्धक लावावीत.
चिन्ह्
नसलेले (आय.एस.आय.) चे मानक खात्रीच्या उत्पादकांची आणि आपल्या माहितीच्या
विक्रेत्यांकडून किटकनाशके विकत घ्यावीत. किटकनाशके विकत घेताना वेष्टनावर नोंदणी
क्रमांक,उत्पादनाचा दिनांक,वापरण्याची मुदत,संपण्याचा दिनांक इत्यादी माहिती
असल्याची खात्री करावी. किटकनाशक वापरण्याची मुदत विकत घेतलेल्यास भेटावे.
किटकनाशकाच्या प्रतीबाबत शंका असल्यास ताबडतोब कृषि विभागाच्या स्थानिक
अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.कृषी विभागाच्या पिक संरक्षण वेळापत्रकात शिफारस
केल्याप्रमाणेच किडनाशकांची मात्रा वापरावी.पत्रकात शिफारस केल्याप्रमाणेच
किटकनाशकांची मात्रा वापरावी.
कृषी विभागाच्या पिक संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे. किडीची वाढ जास्त् होऊ न देता ती
थोडया प्रमाणात आणि किटकनाशकांना चांगला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत असतानाच
त्यांचे नियंत्रण करावे. उदा. अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अळ्या प्रथमावस्थेत
असतांना त्या या अळीच्या बंदोबस्तासाठी पानावर इजा दिसताच उपाययोजना करणे
किफायतशीर असते. सोयोबीनवरील पाने खाणाऱ्या शिफारस केलेल्या मात्रे प्रमाणे
द्रावणे तयार करावीत. पाण्यात मिसळणाऱ्या
भुकटीचे द्रावण करतांना प्रथम थोडया पाण्यात दिलेले मात्रे प्रमाणे भुकटी टाकून
चांगले ढवळून मिसळावे. नंतर त्यात पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिसळावे.प्रवाही
किटकनाशकाच्या बाबतीत प्रथम थोड्या पाण्यात किटकनाशक टाकून नंतर शिफारशीनुसार पाणी
मिसळावे. मावा,तुडतुडे यासारख्या किडी पानांच्या मागील बाजुस राहून पानातील अन्नरस
शोषून करुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. स्पर्शजन्य किटकनाशके वापरतांना
किडीच्या नियंत्रणासाठी विशेषत: ती पानांच्या मागील बाजूस फवारणी करणे अत्यंत
जरुरीचे आहे.धुरळणी सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असतांना करावी. किटकनाशकाचा
परिणाम दिसून येण्यास फवारणीनंतर काही कालावधी लागतो. त्यानंतर त्याचा अपेक्षित
परिणाम दिसून येतो. काही किडीमध्ये पीक वाढीच्या काळात एकापेक्षा जास्त पिढ्या
तयार होतात. त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार किटक नाशकाच्या 2 ते 3
फवारण्या 10 ते 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात.एकाच किटकनाशकाचा वापर सतत केल्याने
किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढते त्यासाठी शिफारस केलेल्या किडनाशकाची आलटून पालटून
फवारणी करावी, अशा सुचना जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयामार्फत शेतकरी बांधवांसाठी
देण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांनी त्यांचा अवलंब करुन आपला शेतात किटक नाशके व
औषधांची फवारणी करावी.
- संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-
अलिबाग
00000
Comments
Post a Comment