जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी 'विकास संवाद' कार्यशाळ : 'आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची भुमिका' याविषयावरही मार्गदर्शन
अलिबाग,
जि. रायगड(जिमाका)दि.10- शासनाच्या
विविध विभागांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करुन
त्यासंदर्भात माध्यमांमधील तज्ज्ञ संपादक, प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय
करण्यासाठी गुरुवार दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'विकास
संवाद' कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी 'आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची
भूमिका' याविषयावर डॉ. बबन जोगदंड यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवार दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता या
कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल. यावेळी
जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल
पा
रसकर, कोकण विभागाचे विभागीय माहिती
उपसंचालक डॉ. गणेश मुळे, तसेच मान्यवर संपादक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शासनाचे विविध विभागांमार्फत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या
कामगिरीचा आढावा सादर करण्यात येईल.
यावेळी विविध विभागप्रमुखही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या
सत्रात यशदा, पुणे येथील तज्ज्ञ
मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड हे उपस्थित माध्यम प्रतिनिधींना 'आपत्ती व्यवस्थापनात
माध्यमांची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर कार्यशाळेचा समारोप
होईल. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व माध्यमप्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे
आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर
पाठक यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment