पर्यटन पर्व उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दि.5 ते 25 ऑक्टोबर
या कालावधीत 'पर्यटन पर्व'हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र
राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन वृद्धीसाठी विविध उपकम राबविण्यात
येत आहे. त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज
जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.
गणेश मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल
जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, डॉ. बबन जोगदंड, महाराष्ट्र पर्यटन
विकास महामंडळाचे डी.एन. करंजकर आदी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment