अंडीःआहारातील उच्च प्रथिनांचा स्त्रोत
जागतिक अंडी दिन साजरा करण्यामागचा उद्देश
हा आहे की लोकांमध्ये अंड्यांच्या सेवनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अल्प
दरामध्ये उपलब्ध होणारी अत्युच्च दर्जाची प्रथिने (प्रोटीन्स्) यांचा वापर करुन
कुपोषण दुर करणे हा होय.
आयआयटी दिल्ली येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. ऋतिका खेडा यांनी भुकबळी, कुपोषणावर
सादर केलेली वस्तूस्थिती अत्यंत भयावह आणि धक्का देणारी आहे. जागतिक स्तरावर खाद्य
उपलब्धता व कुपोषण यावर संशोधन करणाऱ्या संस्थांनी जाहीर केलेली आकडेवारी विचार
करण्यास भाग पाडणारी आहे. कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात भारत 118 कुपोषण रास्त्
देशांमध्ये 97 व्या स्थान आहे. भारतामध्ये कुपोषणग्रस्त् लोकांची संख्या 19.46
कोटी असून 1 ते 5 वयोगटातील 44 टक्के मुलांचे वजन सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात
दरवर्षी 2.1 दशलक्ष मेट्रीक टन
गव्हाची नासाडी होते ती ऑस्ट्रेलियाच्या एकूण वार्षिक गहू उत्पादनाइतकी आहे.
कुपोषण निर्मुलन करण्यासाठी समावेशक प्रथिन स्त्रोत अंड्यांचा करसा उपयोग करता
येईल याबाबत चर्चा होणे गरजेचे असून अंड्याचे महत्व् जाणले पाहिजे. राष्ट्रीय पोषण
संस्थेच्या शिफारशीनुसार दर मानसी 180 अंडी प्रतिवर्ष मिळणे गरजेचे असून भारतात दर
माणसी 62 तर महाराष्ट्रात 53 अंडी उपलब्ध आहेत.जागतिक आरोग्य् संघटनेच्या
मुल्यांकनानुसार ज्याला 100 गुणांक दिलेले आहे. असे आईच्या दुधानंतर अंडे हा
जगातील कदाचित एकमेव खाद्य पदार्थ आहे. अंडे हा नैसर्गिकरित्या कवचात बंद असल्याने
निर्भेळ अन्न् घटक असून त्यात कोणत्याही भेसळीला वाव नाही. इतर कोणत्याही
अन्नापेक्षा अंड्यांचे जैविक मुल्य् (बायोलॉजिकल व्हॅल्यू) सर्वाधिक म्हणजे 96
इतकी आहे. तर गाईच्या दुधाचे जैविक मुल्य 87.4 तर मटणाचे 74 इतके आहे. अंड्यामध्ये
प्रथिनांचा (प्रोटीन्स्)मोठा स्त्रोत असून 58 ग्रॅमच्या एका अंड्यापासून 6ग्रॅम
प्रथिने मिळतात. म्हणजे रुपये 50 ते 60 प्रतिकिलोदराचा विचार करतांना अंडे हे
जगातील सर्वात स्वस्त प्रथिनांचा स्त्रोत आहे. अंड्यामध्ये क जिवनसत्व् वगळता
भरपूर प्रमाणात खनिजे व जिवनसत्वे जसे की अबडई इत्यादी असतात. निरोगी ह्दयासाठी
आणि पोषणासाठी आवश्यक समजले जाणारे 9 प्रकारचे ॲमिनो ॲसिड अंड्यामध्ये असल्यामुळे
अंडे हे परिपूर्ण आहार समजले जाते. अंड्यातील कोलीन हा घटक शरीरामध्ये निर्माण
होणारा दाह कमी करतो.तसेच मानवीरक्तातील घातक कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करुन
आवश्यक कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे ह्दय रोगाची जोखीम
कमी करते तसेच कोलीन हे मेंदू आणि चेतासंस्थेच्या आरोग्यासाठी पुरक पोषण मूल्य्
असून मेंदू पेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारी फॉस्फोलिपीडस हे कोलीनमुळे
मिळतात. तसेच कोलीनमुळे मुडदूस,अल्झायमर,हाडांची ठिसूळता आणि मधुमेहाची जखम टाळता
येते.
वयोमानापरत्वे होणारी शरीराची झीज,ताणतणाव,मोतीबिंदू,प्रोस्टेज ग्रंथींची
वाढ,कर्करोग इत्यादी कमी करण्यास अंड्यातील सुक्ष्म् पोषकमूल्य् सेलिनियम उपयोगी
ठरते. निरोगी केसांची वाढ,नखांचे आरोग्य्, नितळ चमकदार त्वचा व शरीर वाढीस अंडे हे
आवश्यक असल्यामुळे सर्वांच्या आहारात अंडे असणे आवश्यक आहे. अंगणवाडी, बालवाडी तसेच
शाळामधून शिक्षकांनी अंड्यांचे महत्व् पटवून दिल्यास निरोगी सदृढ भारत निर्माण
होण्यास मदत होईल यात शंका नाही.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश
मुख्यमंत्री महोदयांच्या महत्वकांक्षी कार्यक्रम
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत 22 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली असून
एकूण 55 गावांमध्ये ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून विविध विकास कामे घेणेत येत
आहेत. जिल्हाधिकारी, रायगड डॉ.विजय सुर्यवंशी यांनी प्राधान्याने या अभियानातील
गावात विविध पशुसंवर्धन विषयक
कल्याणकारी योजना राबविणेबाबत सुचविले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ.अभय यावलकर यांनी राजिप पशुसंवर्धन विभागास कुपोषण निर्मुलन करणाऱ्या
तसेच झटपट लाभ देणाऱ्या कुक्कुट व शेळी पालनाच्या योजना प्राधान्याने अभियानातील
गावांत राबविण्यात याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सभापती राजिप
कृषी व पशुसंवर्धन डी.बी.पाटील यांनी
पशुसंवर्धन विषय समिती मध्ये ठराव घेवून प्रत्येक गावातील पाच कुपोषित बालकांच्या
मातेस एकात्मिक कुक्कुट विकास योजनेतून 25 तलंगा व 3 नर कोंबडे वाटप ही योजना
राबविण्यात येणार आहेत. तसेच 13 ऑक्टोबर जागतिक अंडे दिनाचे औचित्य् साधून
पशुसंवर्धन विभागामार्फत अंगणवाड्या,बालवाड्या आदिवासी आश्रमशाळा,प्राथमिक
शाळांतील सर्व मुलांना उकडलेली अंडी देवून अंड्यांचे आहारातील महत्व पटवून देण्यात
येणार आहे.
-डॉ.वाय.ए.पठाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड -अलिबाग
Comments
Post a Comment