वाचन प्रेरणा दिवस पुस्तके हीच खरी ज्ञानाची साधने- डॉ. मिलिंद दुसाने
अलिबाग, जि. रायगड (जिमाका)
दि.13- आजच्या युगात मोबाईल, टॅब
सारख्या अनेक साधनांद्वारे आपल्या एका क्लिकवर जगभरातील माहिती उपलब्ध आहे. परंतू
आपण माहितीचे साधने ज्ञानाची साधने समजत आहोत. मात्र असे न समजता ज्ञानसंपादन
करण्यासाठी अधिकाधिक ग्रंथवाचन केले पाहिजे कारण पुस्तके हीच खरी ज्ञानाची साधने
आहेत, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज येथे केले.
येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. दुसाने बोलत होते.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.
अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (दि.15 ऑक्टोबर) आज वाचन प्रेरणा दिवस साजरा
करण्यात आला. त्यानिमित्त ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वाचन कक्षात वाचकांशी
संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डी.
बी वळवी, प्रा. श्याम जोगळेकर, श्रीमती विभावरी कांबळे, तांत्रिक सहाय्यक अजित
पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात
आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जिल्हा ग्रंथालय अधिकारी वळवी यांनी केले. तर प्रा. श्याम जोगळेकर, श्रीमती विभावरी
कांबळे यांनी आपले वाचन अनुभव उपस्थित वाचकांसमोर मांडले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजित पवार यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय
कार्यालयातील वाचन कक्षातील वाचक विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment