राष्ट्रीय एकता दौडचे अलिबाग येथे यशस्वी आयोजन




रायगड-अलिबाग दि.31- (जिमाका) : सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अलिबाग बीच येथे आयोजित एकता दौडचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. 
या राष्ट्रीय दौडमध्ये पोलीस दलाचे  जवान, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, खेळाडू, क्रीडा संघटना, व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.  यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज