राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौडचे आयोजन




रायगड-अलिबाग दि.30- (जिमाका) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त सकाळी सात वाजता राष्ट्रीय एकता दौड चे रायगड जिल्हा  पोलिस दल व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्ममाने आयोजित केली आहे.   सदर एकता दौड क्रीडा भवन, अलिबाग बीच येथून सुरु होऊन अलिबाग शहरातील प्रमुख रस्त्यावरुन जाणार आहे
यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.  जास्तीत जास्त अलिबागकरांनी यावेळी उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज