जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2017 संपन्न


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या सहकार्याने  जिल्हास्तर युवक महोत्सव स्पर्धेचे दि. 23  व 24 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
            जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार उपस्थित होते.
            जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था, स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धांचे परिक्षण श्री.चेतन पाटील, श्री.विशाल अभंगे, श्री.संतोष वाघमारे, श्री. अमोल कापसे, श्री.देवेंद्र केळुसकर, श्री.सुशिल साईकर, सौ.हर्षदा माणगांवकर यांनी केले.युवा महोत्सवात लोकनृत्य, पखवाज, तबला, हार्मोनियम, कथ्थक, भरतनाट्यम, वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वक्तृत्व स्पर्धेत कविता ढाकवळ,माणगाव - प्रथम क्रमांक, गीता कातकरी,मुरूड - द्वितीय क्रमांक, पखवाज स्पर्धेत विराज म्हात्रे, मानी, अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर, शहाबाज, अलिबाग - द्वितीय क्रमांक, हार्मोनियम स्पर्धेत विशाल पाटील, आवास, अलिबाग - प्रथम क्रमांक, सौरभ भोईर, भिलजी, अलिबाग - द्वितीय क्रमांक,  तबला वादन स्पर्धेत प्रसाद वैशंपायन,खानाव,अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर,शहाबाज,अलिबाग - द्वितीय क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत नमन गृप,अलिबाग - प्रथम क्रमांक , एस. ओ. एस. बालग्राम युवा गृप - द्वितीय क्रमांक, कथ्थक स्पर्धेत देवेश्री थळे,थळ-अलिबाग - प्रथम क्रमांक, सलोनी पाटील, चेंढरे,अलिबाग - द्वितीय क्रमांक तर भरतनाट्यम स्पर्धेत तेजल धनावडे, अलिबाग - प्रथम क्रमांक, कृपा नाईक, थळ,अलिबाग - द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तर युवा महोत्सवामधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी मुंबई येथे होणाऱ्या विभागस्तर युवा महोत्सवाकरीता पात्रता मिळविली असून स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना दि. 24 नोव्हेंबर, 2017 रोजी माळरान, कृषी पर्यटन केंद्र, राजमळा, अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री.प्रल्हाद सोनुने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुशिल साईकर यांनी केले व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने श्री.विशाल बोडके यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून विभागस्तर स्पर्धेकरीता स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. 

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज