करोना जनजागृतीसाठी सरसावले नागरी संरक्षण दल

 


 

अलिबाग जि रायगड दि.9 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात करोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

            या माध्यमातून नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी, गर्दी न करण्याविषयी, ताप, सर्दी, खोकला यासारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदतीकरिता जाण्याविषयी, वय वर्ष 45 वरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

             आज (दि.9) चिरनेर बस स्थानक, उरण मुख्य बाजारपेठ, उरण ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय या ठिकाणी श्री.विलास पाटील, नागरी संरक्षण, उरण  प्र.लिपिक, श्री.ना.के म्हात्रे, वाहनचालक यांनी  करोनाबाबत जनजागृती केली. यासाठी त्यांना उपनियंत्रक,नागरी संरक्षण दल, रायगड श्रीमती राजेश्वरी कोरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज