दक्षता जनजागृती सप्ताहाचे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजन


रायगड (जिमाका),दि.30:- जिल्ह्यात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भ्रष्टाचाराचे विरोधात जनजागृती कार्यक्रमांचे विविध पातळीवर आयोजन करुन भ्रष्टाचार विरोधात नागरिकांनी  जास्तीत जास्त तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दक्षता जनजागृती अभियानमध्ये यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहेत.

या अनुषंगाने अधिक माहिती संपर्कासाठी पत्ता, तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

 टोल फ्रि क्रमांक-1064, व्हॉटस्अप: 9930997700,

संकेतस्थळ: acbmaharashtra.gov.in, मोबाईल ॲप: www. acbmaharashtra.net,

ई-मेल:acbwebmail@mahapolice.gov.in, ट्विटर:@ACB_maharashtra, फेसबुक :

www.facebook.com /maharashtra ACB

संपर्कासाठी पत्ता-

पोलीस अधिक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पिंपळभाट बस स्टॉपजवळ,

अलिबाग जि. रायगड 402209.

दुरध्वनी क्रमांक-9870332291/ 9821233160/ 9730271560 येथे संपर्क साधावा,असे आवाहन शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज