सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड, (जिमाका) दि.31:- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास युवक, स्वयंसेवी संस्था, शासकीय व पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांसह बहुसंख्य नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील वरसोली समुद्रकिनारा येथून सुरु होवून दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, तहसील कार्यालय अलिबाग, जिल्हा पोलीस दल, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्ध संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून वरसोली समुद्रकिनारा, अलिबाग येथे आज सकाळी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
बहुसंख्य नागरिक दौड मध्ये सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना उमाकांत कडनोर- तहसीलदार, सर्वसाधारण यांनी प्रतिज्ञा दिली तसेच अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली आणि समारोप जिल्हाधिकारी कार्यालय झाला.
याप्रसंगी उमाकांत कडनोर- तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, तहसीलदार विक्रम पाटील, नायब तहसीलदार टोलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, आधार फाऊंडेशनचे धनंजय कवठेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान यांसह अन्य मान्यवर सहभागी झाले होते .
सर्व उपस्थितांचे आभार तहसील कार्यालय अलिबाग यांच्या वतीने अलिबाग तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मानले. सदर दौड यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सिद्धांत खंडाळकर यांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
००००००
Comments
Post a Comment