शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले
रायगड (जिमाका),दि.1:- राज्यातील इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या अर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरीता रु.1 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही ) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लक्ष रुपये पर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजना 10 लक्ष ते 50 लक्ष रुपये पर्यंत आहे. तसेच यात शैक्षणिक कर्ज व्याजपरतावा योजना या योजनांचा समावेश असून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्त्म कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपये पर्यंत व परदेशी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त कर्ज मर्यादा 20 रुपये लक्ष पर्यंत आहे.
सन 2023 - 24 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्ह्यासाठी उद्दिष्ट् प्राप्त झाले आहे. या योजनांसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्तींनुसार कर्ज प्रस्तावासोबत आवश्यक् कागदपत्रे, पुरावे हे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक गरजु इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनांच्या अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि.चे जिल्हा कार्यालय-श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या. सदनिका क्र.101, पहिला मजला चेंढरे,पो. ता.अलिबाग,जि. रायगड पिनकोड 402201 दूरध्वनी क्रमांक 02141-224448 वा Email- dmobcalibagraigad@gmail.com येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे निशिकांत नार्वेकर,जिल्हा व्यवस्थापक, अलिबाग- रायगड यांनी केले आहे. थेट कर्ज योजना भौतिक उद्दिष्ट् -100 व 20 टक्के बीज भांडवल योजना भौतिक उद्दिष्ट् - 49 प्राप्त् झाले असून या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment