जिल्ह्यात गणेश उत्सव शांततेत होण्याची परंपरा पाळली जाईल -- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे
अलिबाग (जिमाका) दि. 11:-गणेशोत्सव साठी जिल्ह्यात शासकीय विभागांच्या वतीने विविध उपाय योजना केल्या गेल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने गणेश उत्सव आनंदात व शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त करतानाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी ईद- ए- मिलाद व गणेश विसर्जन एकच दिवशी येत असून यावर्षी देखील जिल्ह्यात कोणताही गुन्हा नोंद न होता उत्सव शांततेत होण्याची परंपरा पाळली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सांगितले
जिल्हा शांतता समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांनी ऑनलाईन व्हिसी द्वारे सहभागी होऊन मार्गदर्शन केले. तसेच आमदार रविंद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा शांतता समितीचे सदस्य लोक प्रतिनिधी , शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या शांती शांतता समितीच्या बैठका वर्षभरात नियमित पद्धतीने व्हाव्यात यासाठी जिल्हास्तरीय समित्या व तालुकास्तरीय समितीतील सदस्यांच्या सूचनांवर आवश्यक कार्यवाही व्हावी अशा सूचना त्यांनी केल्या. विविध विषयांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सण उत्सवाच्या काळात समाज माध्यमांचा वापर करून समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या बाबींवर लक्ष देण्याबाबत सूचना खासदार श्री. तटकरे यांनी केल्या.
पोलीस अधीक्षक श्री. घार्गे यांनी सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्यात आले असून अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत सण उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी सतर्कपणे काम करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र , पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात येत आहे. प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, सुविधा केंन्द्र, क्रेन, अॅम्ब्युलन्स आहेत. सुविधा केंद्रावर आपत्कालीन पोलीस मदत, टोईंग व्हॅन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती, वैदयकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैदयकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षक श्री. घार्गे सांगितले.
यावेळी महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदस्यांच्या सूचनांना उत्तर देताना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामं बाबत माहिती दिली
आमदार रवीद्र पाटील यांनी मुंबई गोवा महामार्ग रस्त्यांचा कामाबाबत खड्डे भरण्यासाठी डांबरीकरणाचा वापर केल्यास गणेशोत्सवात च्या साठी कमी काळात रस्ते अधिक चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतील असे सूचना मांडली.
आमदार महेंद्र दळवी यांनी रस्त्यांच्या सुव्यवस्थेबरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेसची उपलब्धता , महावितरण मार्फत उत्सवाच्या काळातील वीजपुरवठा आदी बाबत महत्त्वाच्या सूचना केल्या.
आमदार अनिकेत तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामा प्रगतीवर नाराजी व्यक्त करताना गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी प्रवास सुखकर होईल यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना केेल्या.
यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते कासू, कासू ते इंदापूर व त्यापुढील टप्प्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच वडखळ येथील चौकात पेेव्हर ब्लॉक बसविणे , हायवेचा परतीचा मार्ग देखील वाहतुकीसाठी दुरुस्त करणे , विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उत्सवाच्या काळात पुरेसा बंदोबस्त व पोलीस अधिकारी -कर्मचारी नियुक्त करणे यावर चर्चा झाली.
बैठकीत सुरुवातीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. झेंडे यांनी प्रास्ताविक केले व पुर्वतयारीचे मुद्दे निहाय सादरीकरण केले . उपस्थित लोकप्रतिनिधी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधींसह शांतता समितीच्या सदस्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
00000
Comments
Post a Comment