जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी आधारावर लेखापाल पदासाठी अर्ज मागवले

 

 

रायगड,(जिमाका)दि.11:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी आधारावर लेखापाल पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  सदर पदासाठी शैक्षणिक, इतर पात्रता व आवश्यक अनुभव पुढील प्रमाणे असून सर्व भत्ते मिळून  25 हजार  रुपये प्रति माह एकत्रित वेतन वर लेखापाल पद हे 11 महिने करीता भरावयाचे आहे.

 

उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान वाणिज्य पदवीधर असावा, संगणकाचे ज्ञान :- टॅली, एम.एस.सी.आय.टी.,  टंकलेखन गती उमेदवाराचा-टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मी. पेक्षा कमी नसावा. (मराठी व इंग्रजी),. कामाचा अनुभव कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सदरचे पद ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाचे असून फक्त 11 महिने या कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहे. उमेदवाराचा या पदावर नोकरी कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही.

या अर्जाचा विहीत नमुना दिलेला असून त्या पध्दतीचा अर्ज अर्जदाराने दि.16 सप्टेंबर 2023 रोजी सायं. 5 वा. पर्यंत प्रत्यक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड या कार्यालयाच्या पुढील पत्त्यावर पोहचतील अशाप्रकारे दाखल करावा. त्यानंतर आलेला अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.

अर्ज दाखल करण्याचा पत्ता :मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,विधी सेवा सदन, जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग-रायगड  असा आहे.

या अर्जाचा नमुना, भरती प्रकियेच्या माहिती करीता अर्जदाराने जिल्हा न्यायालय रायगड यांच्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी अथवा disaalibag@gmail.com या ईमेल वर अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,विधी सेवा सदन, जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग यावर संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक