जिल्हा परिषदेमार्फत पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्याचे डॉ.भरत बास्टेवाड यांचे आवाहन
रायगड(जिमाका),दि.15:-गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेश उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंडळे, व्यक्ती, संस्था, बचत गट तसेच ग्रामपंचायती यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
यासाठी https://tinyurl.com/
स्पर्धेसाठी तांत्रिक सहाय्य व परीक्षण करण्याकरिता जिल्हा स्तरावरून परीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. स्पर्धेचे निकष पूर्ण करणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी पंचायत समिती मधील गटसमन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.
केंद्र शासनाने स्वच्छता ही सेवा अभियान सुरु केले आहे. त्यामध्ये कचरामुक्त भारत हा उद्देश असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.
०००००००००
Comments
Post a Comment