7 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.02:- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे एप्रिल 2025 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि.7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.00 वा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके यांनी दिली आहे.
००००००
Comments
Post a Comment