जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.02:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.03 एप्रिल रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत तनिष हॉटेल अँड रिसॉर्ट, प्लॉट नं. 27, मेन रोड, हिंडाल्को कंपनी समोर, एम.आय.डी.सी. तळोजा, ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील बेरोजगारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु. पवार यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापनांमधील रिक्तपदांसाठी भरती केली जाणार आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवीधर आणि इतर पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे संधी मिळणार आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया: उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.
इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांनी https://cmykpy.mahaswayam.gov.
अधिक माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास 02141-222029 या क्रमांकावर किंवा श्री. महेश भा. बखरे (मो. 9421613757) यांच्याशी संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment