क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र महाड तर्फे पुरुषांचा सन्मान

 

अलिबाग,दि.१०(जिमाका):-महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत राबविण्यात येत असलेल्या नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर ॲड न्यूर्टिशन या घटकांतर्गत "Gender Sensitive Role Model Award " सन्मान पुरस्कार सोहळा महाड येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र, महाड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता.    

    या सोहळ्यात सन्मानार्थीना गटविकास अधिकारी महाड श्री.एन.शिवराज प्रभे, आयसीडीएस (ICDS) अधिकारी श्रीमती हेमांगी गाडगे, पोलीस निरीक्षक श्री.गणेश पवार, सीएमआरसी (cmrc) अध्यक्ष भाग्यश्री मराठे यांच्या हस्ते  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    महिला सक्षमीकरणात पुरुषांचाही हातभार लागत आहे व स्त्रियांकडून पुरुषांचा सन्मान या ठिकाणी होत आहे, हा आगळावेगळा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ राबवित आहे, हे खूप कौतुकास्पद आहे, असे मत महाड गटविकास अधिकारी श्री.एन.शिवराज प्रभे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.

      यावेळी महाड तालुक्यातील २५ पुरुषांना सन्मानचिन्ह देऊन सुधारक सन्मान या  पुरस्काराने गौरविण्यात आले. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज