दहावी, बारावी परिक्षा जिल्ह्यात मनाई आदेश जारी


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.23- रायगड जिल्ह्यात उच्च माध्यमिक परीक्षा (इ.12 वी) दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 पर्यंत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) दि. 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणार असल्याने 21 फेब्रुवारी ते 24 मार्च  2018 या कालावधीत  परीक्षा केंद्र परीसरात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.  
उच्च माध्यमिक परीक्षा (इ.12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) च्या परीक्षाचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यादृष्टीने ज्या ज्या ठिकाणी परीक्षाकेंद्र व वितरणकेंद्र आहेत.  त्या सर्व परीक्षा केंद्रावर व वितरणाचे ठिकाणी परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा भाग म्हणून परीक्षेच्या कालावधीत रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस उप आयुक्त नवी मुंबई कार्यक्षेत्र वगळून) परीक्षा वितरण व परीक्षा केंद्रावरील 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये   जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार परीक्षा वितरण केंद्र व परीक्षा केंद्रावरील 100 मीटरच्या परिसरात गल्ली बोळात परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही इसमास मोबाईल फोन,पेजर, एस.टी.डी.बुथ, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, इंटरनेट कॅफे सेंटर चालू  ठेवण्यावर व परीक्षेकरिता लागणारे साहित्याशिवाय इतर कोणतेही आक्षेपार्ह साहित्य परीक्षा कालावधीत परीक्षा वितरण केंद्रा व परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत