प्रधानमंत्र्यांना दिले 'राजधानी रायगड' पुस्तक भेट


अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन समारंभासाठी हेलिपॅडवर आगमन झाले, त्यावेळी त्यांच्या स्वागतप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  'राजधानी रायगड' हे पुस्तक भेट दिले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, आ.मंदा म्हात्रे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.  'राजधानी रायगड' हे पुस्तक कॉफी टेबल बुक स्वरुपात  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आले होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान