दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन
रायगड-अलिबाग,दि.09(जिमाका):- अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग यांच्या कार्यालयाद्वारे दि.22 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीमध्ये नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्यांचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधिक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग ता.अलिबाग, जि.रायगड यांच्याकडे दि.18 डिसेंबर 2025 पर्यंत पोहचेल अशारितीने पाठवावी.
००००००
Comments
Post a Comment