प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन जेवण, अल्पोपहार, इतर खाद्य पदार्थ पुरविण्याकरिता इच्छुक महिला गटांनी निवदा सादर कराव्यात

 

 

रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या शासकीय शैक्षणिक संस्थेच्या आवारात एकूण 5 इमारत असून 01 हजार 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्याना येथे व्यवसाय शिक्षण दिले जाते. त्याकरीता उपलब्ध असलेला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग जवळ जवळ 99 च्या आसपास असून या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जेवण व अल्पोपहार तसेच इतर खाद्य पदार्थ स्वच्छ व स्वस्त दरात संस्थेच्या आवारात उपलब्ध करुन द्यावयाचे असल्याकारणाने शासनाने प्रचलित खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला गटाच्या आहार व्यवस्थापक ठेकेदारास ज्यांना महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण, अल्पोपहार, चहा, कॉफी इ. खाद्य पदार्थ उत्तमरित्या पुरविण्याचे व शासकीय खाजगी उपहारगृह अथवा Mobile Canteen, (फिरते उपहारगृह) चालविण्याचा अनुभव आहे त्यांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन प्र.प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल वि.द.टिकोले यांनी केले आहे.

त्यांच्याकरीता अटी व शर्ती निविदा सूचना, विहित निविदा नमुना व महत्वाच्या सूचना यासंस्थेत उपलब्ध करण्यात आलेल्या असून त्यांच्या छापील प्रतींची किंमत रुपये 100/- अशी ठेवण्यात आली आहे. आपल्या सिलबंद निविदा विहित नमुन्यात दि.20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत या संस्थेत सादर करण्यात यावी.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे:- हा करारपत्र 11 महिन्यांकरीता (Leave Licence) पध्दतीने करण्यात येईल. करारनामा (Legal Vetted) कायदेशीर असेल. जागेचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त होईल त्यादरानुसार आकरण्यात येईल. विज देयक/पाणी देयक स्वतंत्ररित्या आकारण्यात येईल.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन