मौजे नागाव वर्तकअळी येथील नागरिकांना वनविभाग अलिबाग कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचना

 

 

रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका) :- दि.09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मौजे नागाव वर्तकअळी येथे स्थानि 5 ग्रामस्थांना बिबट्या दिसून आल्याची बातमी वनविभाग अलिबाग यांना प्राप्त झाली. त्यानुसार वनविभाग, पोलीस विभाग आणि रेस्क्यू तज्ञांनी (दि.09 डिसेंबर 2025 रोजी सांयकाळपासून ते आज दि.10 डिसेंबर 2025रोजी) पर्यंत सर्चिग व कोम्बींग ऑपरेशन राबविले व आजतागायत सुरू आहे. या ऑपरेशन दरम्यान बिबटया आढळून आलेला नाही. प्राथमिक अंदाजानुसार हा बिबट्या आपल्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला असण्याची शक्यता आहे तरी देखील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग अलिबाग पुढील काही दिवस या परिसरात दिवस व रात्र गस्त करणार आहे. याकरिता उप वनसंरक्षक अलिबाग यांनी ग्रामस्थांना पुढीलप्रमाणे मागदर्शक सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचाली अथवा प्राणी निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक वनविभागास कळवावे, रात्रीच्या वेळेस गरज असल्यास शक्यतो गटाने किंवा प्रकाशातच वावर करावा, घराभोवती परिसर स्वच्छ ठेवा, जनावरांची विसर्जन स्थळे व कचरा खुले ठेवू नका. पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधून ठेवा. शेतात किंवा मोकळ्या जागेत जाण्यापूर्वी टॉर्च लाईटचा वापर करा. बिबट्याचा पाठलाग, फोटो काढणे किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करु नये. अफवा पसरवणे,चुकीची माहिती सोशल मिडीयावर शेअर करणे टाळावे. प्राण्याला चिथावणी देईल अशी ओरडाओरड करु नये, दगडफेक, धावाधाव करु नये. लहान मुलांना बाहेर एकटे न पाठवणे, पाळीव जनावरे जंगलाच्या कडेला बांधून ठेवू नयेत.

दि.09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मौजे नागाव वर्तकअळी येथे स्थानि 5 ग्रामस्थांना बिबट्या दिसून आल्याची बातमी वनविभाग अलिबाग यांना प्राप्त झाली. प्राप्त माहिती नंतर वनविभागाची पथके तात्काळ घटना स्थळी दाखल झाली. या घटनेची माहिती मिळताच उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सहा. वनसंरक्षक, अलिबाग श्री.जवरे व वनक्षेत्रपाल अलिबाग नरेंद्र पाटील यांना परिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाहीसाठी मार्गदर्शनपर सुचना दिल्या. वन्यजीव बचावासाठी पुणे व रोहा येथील वन्यजीव रेस्क्यू तज्ञांची पथके त्वरीत घटनास्थळी बोलावण्यात आली.

नागाव ग्रामपंचायत सरपंच, नागाव ग्रामस्थ यांनी या ऑपरेशन मध्ये वनविभागास सहकार्य करीत आहे.  वनविभाग या परीस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पुढील कार्यवाही करीत आहे. वन विभाग अलिबाग वनक्षेत्र अलिबाग याव्दारे नागरीकांना सतर्क व सुरक्षित राहण्याबाबत जाहीर आवाहन करीत आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान