महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा दि.11 मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील दौरा
अलिबाग, दि.10 (जिमाका):- लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, दि.11 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता महामहीम राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री.उदय सामंत, पर्यटन, खनिकर्म, उद्योग राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
00000


Comments
Post a Comment