राजपुरी येथील हरविलेली व्यक्ती आढळल्यास मुरुड पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन


अलिबाग, दि.10 (जिमाका):- मुरुड तालुक्यातील रा.राजपुरी येथील पूनम उमेश मोनांक, वय-30 वर्ष, या दि. 16 मार्च 2022 पासून मौजे राजपुरी येथील राहत्या घरातून कपडे धुवायला जाते, असे सांगून घरामधून निघून गेल्या आहेत. त्या अद्यापपर्यंत परत घरी आलेल्या नाहीत, अशी तक्रार दि.18 मार्च 2022 रोजी मुरुड पोलीस ठाणे येथे दाखल झाली आहे.

बेपत्ता असलेल्या पूनम उमेश मोनांक यांचे वर्णन पूनम उमेश मोनांक, वय 30 वर्ष, उंची 05 फूट, बांधा सडपातळ, वर्ण गोरा, नेसूस-लाल रंगाची फुले असलेली मोती रंगाची साडी व गुलाबी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात छोटे बॅन्टेक्सचे मंगळसूत्र, कुडी, नाकात सोनाची चमकी, हातात हिरव्या बांगड्या असे आहे.

या महिला इसमाचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तरी या बेपत्ता महिला कोणालाही दिसल्यास वा आढळून आल्यास तात्काळ मुरुड पोलीस ठाणे येथे दूरध्वनी क्रमांक 02144-274033 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे वाय.टी.निकाळे यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज