उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

अलिबाग, दि.10 (जिमाका):- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.11 मे 2022 रोजी लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे-

सकाळी 06.30 वाजता शासकीय निवासस्थान, रत्नसिंधू बंगला, मादाम कामा रोड, मुंबई येथून मोटारीने माणगाव, जि.रायगड कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, माणगाव, जि.रायगड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, माणगाव येथून मोटारीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे कडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे- 24 व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती, (स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे जि.रायगड, संदर्भ: कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड). दुपारी 01.00 वाजता लोणेरे, जि.रायगड येथून मोटारीने मुंबई कडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज