सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त 31 रोजी राष्ट्रीय एकता दौड


अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन हा राष्ट्रीय एकता, अखंडता व राष्ट्राची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी साजरा केला जातो. नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या वतीने बुधवार दि. 31 रोजी सकाळी सात वा. क्रीडा वन, अलिबाग बीच येथुन राष्ट्रीय एकता दौड (5 कि.मी अंतर) आयोजित केली आहे. सदर एकता दौडमध्ये शालेय  विद्यार्थांचा गट व खुला गट असे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटात प्रथम तीन विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.  तसेच सदर एकता दौड कार्यक्रमाच्या ठिकाणी जे 500 स्पर्धक  प्रथम  हजर राहतील त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालया कडून टी-शर्ट देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, नागरिकांनी व स्पर्धकांनी यात सहभागी होवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा. एकता दौड मध्ये सहभागी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी करीता पोलीस निरीक्षक संजय साबळे मो.न.8275693023, 9822777652 व पोशि प्रथमेश नागावकर मो.न. 8421071988 (कल्याण शाखा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज