जिल्हा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा 27 व 28 जानेवारीला


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:-  जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या वर्ग-3 कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2017 ही दिनांक 27 व 28 जानेवारी, 2018 रोजी जिल्ह्याच्या मुख्यालयी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेची आवेदन पत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रायगड अलिबाग यांच्याकडे प्राप्त होतील. तरी उमेदवारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड अलिबाग यांच्याकडे संपर्क साधावा. याची सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावे असे उप आयुक्त गणेश चौधरी उप आयुक्त (आस्थापना) कोंकण विभाग, नवी मुंबई यांनी कळविले आहे.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान